Home दुःख द बातमी समृद्धी महामार्गाच्या टिप्परला भिषण अपघात १३ मजुरांचा मृत्यु तर ३ गंभीर

समृद्धी महामार्गाच्या टिप्परला भिषण अपघात १३ मजुरांचा मृत्यु तर ३ गंभीर

समाधान देशमुख

सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा – मेहकर महामार्गावर राहेरी – दुसरबिडच्या मध्ये तढेगाव फाटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जात असतांना टिप्परचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ मजुरांचा मृत्यु तर ३ मजुर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जालना येथे हलविण्यात आले असल्याची प्राथमिक स्वरुपाची माहिती वृत्त लिहीपर्यंत हाती आली आहे.
सदरील अपघात हा आज दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला.


हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील टिप्पर क्रमांक एम.एच.११,ए.एल.३७२८ हे दुसरबिड वरुन लोखंडी गज व सिमेंट बॅग घेऊन समृद्धी महामार्गाच्या तढेगाव येथिल कॅम्पवर जात होते.सदरील टिप्परमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूरही बसलेले होते. तढेगाव फाट्यावरुन आत शिरल्यानंतर समोरुन येणाऱ्या वाहणाला वाचविण्याच्या प्रयत्नांमध्ये टिप्पर रोडच्या खाली उतरवले परंतु या भागामध्ये गेल्या तिन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु असुन रस्ताची कड दबल्यामुळे टिप्पर पलटी झाले.त्यामुळे टिप्परमध्ये असलेले मजुर हे टिप्परमध्ये असलेल्या लोखडी गजाखाली व टिप्परखाली दबल्या गेले.


टिप्परमधील सर्व मजुर हे यु.पी बिहारचे असण्याची माहीती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here