Home दुःखद बातमी पोलिस कर्मचाऱ्याने का केली आत्महत्या ? पोलिस दलात हळहळ!

पोलिस कर्मचाऱ्याने का केली आत्महत्या ? पोलिस दलात हळहळ!

बुलडाणा : जिल्ह्यातील पोलीस दलासाठी दुःख द आणि हळहळ निर्माण करणारी घटना आज घडली आहे. एका कर्मचारी आज पोलीस दलास कायम सोडून गेला, मात्र त्याने जो मार्ग पत्करला तो मात्र मनाला चटका लावून गेला आहे.

बुलडाणा जिल्हा पोलीस दलात आज दुःखद बातमी देणारी घटना उघडकीस आलेली आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव संजय आनंद मिसाळ (55) आहे. मृत पोलीस कर्मचारी हे जिल्हा पोलीस दलाच्या वाहन विभागात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते . संजय मिसाळ हे मूळचे सिंनगाव जहांगीर ता. देऊळगाव राजा चे रहिवासी होते . 18 ऑगस्टच्या रात्री त्यांनी बुलढाणा येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्याना लवकरच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यानच 19 ऑगस्टच्या सकाळी त्याचा मृत्यू झाला. संजयने आत्महत्या का केली हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलीस विभाग याचा तपास करत आहेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून या घटनेची चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here