Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण ;आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू

बुलडाणा:  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्याअहवालांपैकी एकूण 1959 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1958 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 468 तर रॅपिड टेस्टमधील 1490 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1958 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगाव जामोद शहर : कृष्णा नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच आज 01 रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 673488 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 86662 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86662 आहे. आज रोजी 1958 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 673488 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87363 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86662 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here