Home कोरोना अपडेट्स एसटी ची रातराणी बस सेवा २० ऑगस्ट पासून सुरू

एसटी ची रातराणी बस सेवा २० ऑगस्ट पासून सुरू

 

बुलडाणा,  दि. १८: एस टी महामंडळाची रातराणी बस सेवा कोविड मुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा २० ऑगस्ट २०२१ पासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

 


रातराणी बस सेवेमध्ये बुलडाणा ते नागपूर रात्री ९ वाजता, बुलडाणा ते पुणे रात्री ९. १५ वा, मेहकर ते पुणे रात्री ७.३० वा, मलकापूर ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं ६.३० वाजता आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत महामंडळ जलद, वातानुकूलित शिवशाही आदी सेवेद्वारे प्रवाशी वाहतूक करीत आहे. तरी २० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या रातराणी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here