Home Breaking News ओळख पटवा आणि वाहन घेवून जा; पोलीस ठाण्यात बेवारस 275 दुचाकी...

ओळख पटवा आणि वाहन घेवून जा; पोलीस ठाण्यात बेवारस 275 दुचाकी व तीन चाकी ऑटो !

पोलीस स्टेशनमध्ये वाहन जप्त असल्यास कागदपत्रांमधून मालकी हक्क दाखवावा

-जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

बुलडाणा, : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलीत करून पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील आवारात जप्त करण्यात आलेली आहे. त्या सर्व बेवारस वाहनांची निर्गती करणे असल्याने जप्त करण्यात आलेल्या वाहनावर ज्या कोणत्याही व्यक्तीचा हक्क असेल त्यांनी हे आवाहन प्रकाशित झाल्याचे तारखेपासून सात दिवसाचे आत पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे येऊन बेवारस स्थितीत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क दाखवावा.
पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेले मालमत्तेवर कुणीही मालकी हक्क प्रस्थापित केला नाही, तर जप्त मालमत्तेची निर्गती करण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले बाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचे www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांचे यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक गिरीष ताथोड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here