Home जागर बच्चू कडूंना जे सुचत, तसं सर्वच पालकमंत्र्यांना सुचत का नाही?

बच्चू कडूंना जे सुचत, तसं सर्वच पालकमंत्र्यांना सुचत का नाही?

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वांतत्र्यांचा ७५ वा वर्धापनदिन होता. चांदा ते बांदा हा स्वांतत्र्यदिन उत्सव देशवाशीयांनी आनंदाने, देशाभिमानाने औतपौत भरुन उत्सवात साजरा केला.

देशभक्तांचा लढा आणि सैनिकांचा संघर्ष यांच्यामुळे हा स्वातंत्र्यदिन आपणास पाहायला आणि भोगायला मिळतो आहे. प्रत्येक भारतवाशी आज देशाकरिता लढलेल्या देशभक्तांची आणि त्यांच्या लढाऊ संघर्षाची आठवण अभिमानाने सांगतात. *जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले* किंवा *ऐ मेरे वतन के लोगो,,,,जरा याद करो कुर्बाणी* अशा अनेक देशभक्तीपर गाण्याने सारा माहोल देशभक्तीने भरून गेलेला आहे.
प्रत्येक जन आपल्या भाषणातून देशभक्तांना, शहिदांना अभिवादन करतात, त्यांच्या हौतात्माचे गुणगाण गातात.

आजच्या दिवशी सारे आनंदाने असतांना मात्र ज्यांच्या घरातून देशासाठी लढतांना हौतात्म मिळाले अशा सैनिकांच्या घरात आंनदाश्रु आणि देशभक्तीचा बुलंद नारा असतो.
देशासाठी हौतात्म मिळालेल्या या शुर जवांनाच्या अंत्यविधीला अमर रहे च्या घोषणानंतर कुंटूबांना सरकारकडून मदतनिधीची घोषणा होते.
घरातून कर्ता जवान देशासाठी देणाऱ्या या कुंटुबांचा मान -सम्मान होणे देशासाठी खुपच महत्वाचे आहे.
राज्याचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.बच्चूभाऊ कडू यांच्या कल्पनेतुन एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम अकोला मध्ये घेण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यमंत्री बच्चू भाऊ यांनी आज अकोला जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या कुटूंबासोबत शाहीभोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला. देश रक्षणाकरीता प्राणाची आहुती देणाऱ्या या कुटूंबाच्या सन्मानाकरीता हा एक छोटासा उपक्रमात्मक कार्यक्रम होता.
अकोला जिल्हयातील शहीद कुंटुबांचा यथा मानसन्मान करत, त्यांचे चरण धुऊन, त्यांना हाताने गोडघास भरून पालकमंत्री म्हणुन बच्चूभाऊ कडू यांचे आजचे कार्य खरचं कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाने शहीद कंटूबं सुखावले असणार यात संदेह नाही,,,,

राज्यभर सर्व पालकमंत्र्यांनी जर हा उपक्रम राबवला तर यातुन शहीदांच्या कुंटूबांच्या सन्मानाचा संदेश समाजात रूजवला जाईल.

बच्चूभाऊ कडू यांचा हा स्तुत्य उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन २६ जानेवारी ” प्रजासत्ताक दिनी ” सर्व पालकमंत्र्यांच्या मदतीने शहीद कुंटूबांचा मान -सन्मान करावा अशी सर्व देशवाशींयांची अपेक्षा आहे,

बच्चूभाऊ कडू यांच्याच ओळीने थांबावे वाटते,,,
असु दे तूझा
हिरवा प्यारा,
असु दे तुझा
निळा न्यारा,
असु दे तूझा
भगवा सुनहरा,
सबसे प्यारा
तिरंगा हमारा !

 

धन्यवाद !

जय प्रहार !

-देवेश लोखंडकार
एक सच्चा कार्यकर्ता, खामगाव
संवाद : 788 821 2826

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here