Home प्रेरणदायी मुलाचा वाढदिवस ठेवला बाजूला आणि संवेदनशील बच्चूभाऊ ने घेतला हा निर्णय..!

मुलाचा वाढदिवस ठेवला बाजूला आणि संवेदनशील बच्चूभाऊ ने घेतला हा निर्णय..!

 

अकोला: सामान्य माणसाच्या कामासाठी प्रसंगी कुणाच्याही कानाखाली आवाज काढणाऱ्या बच्चूभाऊनी स्वातंत्र्यदिनी आगामी वर्ष हे अकोला जिल्ह्यासाठी सेवावर्षं जाहीर करत त्या सेवेचा श्रीगणेशा शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजन करून आणि शहिदांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ प्रेमाचा घास घालून केला. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस बाजूला ठेऊन त्यांनी या सर्वांसोबत वेळ घालवत संवेदनशीलतेचा परिचय देत शाहीदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी रविवारी दुपारी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी जेवण वाढलं. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खरंतर शहिदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची ही एक संधी होती, आणि स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे हे औचित्य अधिकच औचित्यपूर्ण झाले.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत ते अधिक जागरुक आहेत. प्रशासनातल्या प्रत्येकाने असं जागरुक असावं, याबद्दलही ते आग्रही आहेत. यासाठी जिल्ह्यातील २८ शहिद कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी त्यांनी घेतल्या. त्यांची अडीअडचण जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे प्रश्न मार्गीही लागलेत.

पालकमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेची प्रचिती आजच्या शहीद कुटुंबियांसमवेत स्नेहभोजन या कार्यक्रमातून आली. वीरमातांचे पाय स्वतः पालकमंत्र्यांनी धुतले. या स्नेहभोजनाचा थाट मोठा होता. प्रत्येक वीर माता, वीर पिता , वीर पुत्र, वीर कन्या, वीर पत्नी ह्यांना सन्मानाने बसविण्यात आले. स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनातले उच्च अधिकारी वाढपी झाले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्याप्रमाणे ‘ तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले. स्वतः ‘पूर्णब्रह्म’ असलेले ‘अन्न’ ही देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांच्या वारसांच्या, अशा वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या माता पितांच्या तोंडी जाऊन धन्य होत होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनीच भाऊंच्या मुलाचा वाढदिवस असतो. परिणामी सर्व कार्यक्रम ते आटोपते घेऊन लवकर घरी जातील असा काहींचा अंदाज होता, तो साफ चुकला. सकाळी शनिवारपासून अकोल्यात मुक्कामी असलेल्या भाऊंनी रविवारी सकाळी झेंडावंदन केले. या कार्यक्रमातच त्यांनी आगामी वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले. आणखी काही कार्यक्रम आटोपून त्यांनी दुपारी शहिदांच्या कुटुंबियांसोबत स्नेहभोजन केले. 3 वाजता ग्राम सुकोड येथील कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी सायंकाळी शेगाव येथे प्रस्थान केले. तेथे कर्मयोगी दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर मुरारका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. वृक्ष क्रांती मिशन द्वारा आयोजित येथील वृक्षारोपण समारंभ पार पडल्यानंतर शेगाव येथीलच विश्रामगृहात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व निवेदनेही स्वीकारली …
कामाच्या या व्यापात या बापाला मुलाच्या वाढदिवसाची आठवण आली नसेल असे नाही परंतु जनसेवेचा वसा घेतलेल्या भाऊंनी ते जराही जाणवू दिले नाही. परतीच्या प्रवासातही अकोट येथील एक कार्यक्रम आटोपून भाऊंचा ताफा रात्री उशिरा कुरळ पूर्णा येथे पोहोचला…रात्री बाराच्या आत पोहोचले म्हणून मुलाला हॅपी बर्थ डे म्हणू शकले…

वा भाऊ सॅल्युट….

-सुधाकर खुमकर, अकोला
8888890127

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here