Home खामगाव विशेष नाना पटोले, मुकूल वासनीक यांच्या उपस्थितीत खामगांवात कॉंग्रेसचा ‘संकल्प मेळावा’

नाना पटोले, मुकूल वासनीक यांच्या उपस्थितीत खामगांवात कॉंग्रेसचा ‘संकल्प मेळावा’

मोठया संख्येने उपस्थित रहावे – मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

खामगांव: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष,आमदार नाना पटोले व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी केंद्रीयमंत्री मुकूल वासनीक हे मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी बुलडाणा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेंच्या प्रत्येक निवडणुकी मध्ये कॉंग्रेसचा तिरंगा झेंडा फडकविण्याचा संकल्प घेण्यासाठी खामगांव येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा ‘संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
शेगांव रोडवरील राणा लकी सानंदा एज्युकेषनल शाँवरच्या प्रांगणात दुपारी 1 वाजता आयोजित या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हयाच्या संपर्कमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजयभाऊ राठोड, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,प् सरचिटणीस यादवगणेश पाटील, अनुसुचित जाती सेलचे प्रदेशअध्यक्ष विजय अंभोरे,बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे,जि.प.अध्यक्षा सौ.मनिशाताई पवार,महिला प्रदेश सरचिटणीस सौ.जयश्रीताई षेळके,मलकापूरचे आमदार राजेश एकडे,माजी आमदार कृष्णराव इंगळे, माजी आमदार हर्शवर्धन सपकाळ, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाशराव पाटील,लक्ष्मणराव घुमरे,सौ.स्वातीताई वाकेकर,युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे,एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड.जावेद कुरेशी,अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसरमोल यांच्यासह जिल्हयातील कॉंग्रेसचे नगरअध्यक्ष, जिल्हा परिशद सभापती, पंचायत समिती सभापती व कॉंग्रेसच्या सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याला खामगांव मतदार संघासह बुलडाणा जिल्हयातील कॉंग्रेसजणांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,कॉंग्रेस नेते ज्ञानेश्वररदादा पाटील यांच्या सह काँगेस पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here