Home Breaking News आमदार संजय गायकवाड यांनी खेचून आणला विकास कामासाठी 6 कोटी 65 लाखांची...

आमदार संजय गायकवाड यांनी खेचून आणला विकास कामासाठी 6 कोटी 65 लाखांची निधी

बुलढाणा नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 6 कोटी 65 लक्ष रुपये निधी मंजूर

आ.संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

बुलढाणा नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत 6 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस मंजुरी दिली.
शासनाच्या वतीने नगरपालिका अंतर्गत करावयाच्या विविध विकास तसेच सौंदर्य करण कामास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान मिळत असतो बुलढाणा नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे पाठपुरावा करीत होते शहरातील विविध कामांची माहिती त्यांनी या संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांना या आधी दिली होती या कामांसाठी निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी देखील ते प्रयत्न करीत होते आमदार गायकवाड यांच्या परिश्रमानंतर बुलढाणा नगरपालिकेला सहा कोटी पासष्ट रुपये मंजूर करण्यात आले आहे या निधीच्या माध्यमातून शहरातील एकूण 6 कोटी 65 रुपयाची कामे केली जाणार आहेत.
सदर योजनेचे निकष शासनाच्या निर्देशानुसार ठरविण्यात आलेले आहे.या योजनेअंतर्गत प्रकल्पाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे त्यामुळे सदर प्रकल्पांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम अधिकार्याच्या तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असल्याची खातरजमा संबंधित जिल्हाधिकारी यांनी करून घेतल्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच कामे केली जाणार आहे तसेच सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयीसुविधांच्या कामात यामुळे भर पडणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here