Home विदर्भ गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील यांची भाऊंच्या निवासस्थानी सात्वंतनपर भेट

गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील यांची भाऊंच्या निवासस्थानी सात्वंतनपर भेट

 

खामगांव:- राज्याचे गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील यांनी दि.13 ऑगस्ट 2021 रोजी संत नगरी शेगांव येथे पोहोचुन वैकुंठवासी,कर्मयोगी स्व.शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सात्वंनपर भेट दिली. स्व.शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दर्षन घेतले.तसेच निळकंठदादा पाटील,श्रीकांतदादा पाटील,हरिहरदादा पाटील,रामदादा पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली.यावेळी त्यांनी भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संबंध आणि भाऊंच्या विविध पैलूवर उजाळा देत भाऊंच्या जाण्याने जी उणीव निर्माण झाली ती कधीही भरुन निघणार नसल्याचे ना.सतेज पाटील यांनी सांगितले.
यावेळी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपुत,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी,बुलडाणा जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाशराव पाटील, प्रदेश महिला सरचिटणीस सौ.जयश्रीताई शेळके, शेगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,धनंजय देशमुख,बुलडाणा लोकसभा युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तुशार चंदेल, नगरसेवक किशोरअप्पाभोसले,एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहितसिंह राजपुत, माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर आदी उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here