Home प्रेरणदायी सहकारनेते पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘वृक्ष महोत्सव’

सहकारनेते पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘वृक्ष महोत्सव’

 

पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी प्रत्येकाने वृक्ष लावणे काळाची गरज – सहकारनेते पांडुरंगदादा पाटील

शेगांव – येथील कृषि उत्पन्न बाजार समिती व गो- ग्रीन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून उपबाजार माटरगाव बु येथे १०० वृक्षांची लागवड करण्यात येऊन वृक्षमहोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा न्यानेश्वरदादा पाटील यांचे हस्ते गजानन महाराज यांचे प्रतिमेस हार, पूजा करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती श्रीधर पाटील उन्हाळे होते.

सदर कार्यक्रमा प्रसंगी सहकारनेते पांडुरंगदादा पाटील यांचे सह माटरगाव ग्रामपंचायत सरपंच सौ राधाताई टिकार, ग्रामपंचायत सदस्य इनायत भाई, अनंतराव आळशी, समितीचे उपसभापती सूनिल वानखडे, संचालक पुंडलिक भिवटे, रामरतन पुंडकर, माजी संचालक गोपाळराव मिरगे, गोपाळराव आखरे, अनंत मिरगे, भीमराव राऊत,श्रीकांत तायडे, संजय गव्हादे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील भाबेरे बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर, गो-ग्रीन फाउंडेशन ची टिम तसेच उपबाजार परिसरातील प्रतिष्टीत नागरिक यांचे सह समितीचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते उपबाजार येथील ८ एकर समितीचे जागेमध्ये १०० वृक्षांची लागवड ट्री गार्ड सह करण्यात येऊन कृषी दिनानिमित्त वृक्ष महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सहकाररनेते पांडुरंगदादा पाटील, माऊली ग्रुप चे अध्यक्ष न्यानेश्वरदादा पाटील यांचे वतीने वृक्षारोपण व पर्यावरण संबधाने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गो- ग्रीन फाउंडेशन चे सदस्य काकड सर यांनी तर आभार प्रदर्शन समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here