Home Breaking News नगर पालिकेत चागलाय असा सावळा गोंधळ!

नगर पालिकेत चागलाय असा सावळा गोंधळ!

खामगाव: नगर परिषद तर्फे प्रभाग क्रमांक 11 मधील तरण तारण नगर मंदिर परिसरात नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्ज्याचे काम करण्यात आले असून नगर अभियंत्याने कामाबाबत सदोष अहवाल दिल्यानंतर सुद्धा अनामत रक्कम काढण्यासाठी कंत्राटदाराने खोटे दस्तवेज तयार करून  दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, ही बाब गंभीर स्वरूपाची असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी , अशी मागणी काँग्रेस नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
खामगाव नगर परिषदेतर्फे नागरी वस्तीत दलित सुधार योजनेअंतर्गत अंदाजे एक वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक 11 मधील तरण तारण मंदिर परिसरात सात लक्ष रुपये खर्च करून सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले होते , कंत्राटदाराने हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केला असून या रस्त्यावर कुठलीही वर्दळ नसतांना सुद्धा हा रस्ता जागोजागी खराब झाला असून,  रस्त्याला ठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची लेअर उखडून पडली आहे.   नगर अभियंता श्री. निरंजन जोशी यांनी संबंधित कामाचा टेस्ट रिपोर्ट घेतला असता सदर रस्ता काम सदोष आढळून  असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला अनामत रक्कम देण्यात येऊ नये असा नोटशीट वर अभिप्राय दिला होता.
तरी देखील कंत्राटदाराने खोटे दस्तावेज तयार करून , स्थळ निरीक्षण न करता प्रभारी नगरअभियंता श्री मस्के यांची स्वाक्षरी घेतली . अनामत रक्कम काढण्यासाठी उपरोक्त प्रकरण स्वाक्षरीसाठी अकाउंटंटकडे गेले असता त्यांना उपरोक्त प्रकरणात खोटे  दस्तावेज तयार केले गेले असल्याचा संशय आल्याने त्यांनी उक्त कामाची अनामत रक्कम काढली नाही.खामगाव नगर परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक नगरसेवक हे इतर कंत्राटदारांच्या नावावर विकास कामे घेतात व त्या कामाचे खोटे दस्तावेज तयार करून कामाचे बिल काढण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद अभियंत्यावर दबाव आणतात . काही नगरसेवीकांचे पती,  नगरसेविका पुत्र अनेक महत्त्वाच्या फाईली घेऊन न प विभागात फिरत असतात.  ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. याबाबतची सुद्धाचैकशी होणे गरजेचे आहे .
खोटे दस्तावेज तयार करून अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून सर्व संबंधित दोषींवर कारवाई करावी व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नगरसेवक अब्दुल रशिद अब्दुल लतिफ श्रीमती सरस्वती भास्कर खासने व काँग्रेस नगरसेवकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here