Home जागर ६५ वर्षीय आजीबाईचे असेही प्रेरणादायी कार्य

६५ वर्षीय आजीबाईचे असेही प्रेरणादायी कार्य

गयाबाई या आजीने केला घरासमोरील वृक्षाचा आठवा वाढदिवस साजरा
जागतिक पर्यावरण दिनाचे जपले महत्त्व !
साखरखेर्डा दिनांक ५ जुन
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात असलेल्या आडगावराजा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व जपत गयाबाई नारायण कहाळे या ६५ वर्षीय आजीने आपल्या घरासमोर असलेल्या वृक्षाची पुजा करुण  वृक्षाचा आठवा वाढदिवस साजरा केला आहे. गयाबाई कहाळे या आजीने आठ वर्षा पुर्वी ग्रामपंचायतीने वाटप केलेल्या बदाम या वृक्षाच्या झाडाचे जतन व सर्वधन केले पोटच्या मुलाप्रमाणे या झाडाला जिव लावला आणी आज या वृक्षाला आठ वर्ष पुर्ण झाले आणी आजच जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे आवर्जुन  काही महिलांना बोलाऊन हळद कुंकु लावत झाडाची पुजा केली व महिलांना सुद्धा हळद कुकूं लावले .जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभ मुहर्तावर गयाबाई कहाळे या आजीबाईचा आदर्श ईतर महिलांनी घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here