Home Breaking News कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना : अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व...

कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना : अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस

मुंबई / श्रीधर ढगे पाटील

राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना’ सुरू केली आहे.


या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत.


प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. स्पर्धेत सहभागी गावांना विविध २२ निकषांवर ५० गुण देण्यात येणार आहेत.

 

कोरोनाचा भविष्यात धोका वाढू नये, यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना मुक्त गाव मोहीम ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. अशी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना’ सुरू केली. हा निर्णय अंत्यत चांगला आहे. आता गावा गावात कोरोना मुक्त होण्यासाठी लोक चळवळ निर्माण होईल व लोक सहभाग वाढेल. देशात राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने कोरोनाची बिकट परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा याबाबतीत कौतुक केलं आहे. आता हळूहळू निर्बंध कमी होतील अशी आशा आहे. मात्र अजून संकट टळलं नाही हे लक्षात घेवून नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.


स्वप्निल ठाकरे पाटील
अध्यक्ष श्री छत्रपती प्रतिष्ठान खामगाव

(टीप:  या योजनेची संपूर्ण माहिती व नियमावली हवी असल्यास आमच्या 9423237001 या व्हाट्सअपवर संपर्क करावा)

(वाचा इंग्रजी अनुवाद…)

The Government of Maharashtra has launched the ‘Corona-free Gaon Puraskar Yojana’ to promote “Corona Mukti” in rural areas of the state, to create cohesiveness in the Gram Panchayats to overcome Corona Virus and to make the whole of Maharashtra corona free.
Under this scheme, prizes of Rs. 50 lakhs, 25 lakhs and 15 lakhs will be given to the first 3 Gram Panchayats in each revenue division respectively. Apart from this, development works worth Rs 50 lakh, Rs 25 lakh and Rs 15 lakh will be sanctioned to them respectively. Each Gram Panchayat has to set up 5 teams at its level and carry out various activities through them. The participating villages will be given 50 marks on 22 different criteria.
#BreakTheChain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here