Home आरोग्य महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ

११२६ रूग्णांना मिळाली उपचाराची ‘संजीवनी ‘

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात असा लाभ

योजनेविषयी तक्रार असल्यास १५५३८८ व १८००२३३२२०० क्रमांकावर संपर्क साधावा

बुलडाणा, १: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्हयात राज्य आरोग्य हमी सोसायटी ,मुंबई मार्फत राबविण्यात येते. या योजने अंतर्गत कोविड व नॉन कोविड उपचार रोख रहित पद्धतीने अंगीकृत रुग्णालयातून करण्यात येतात. महात्मा फुले जनारोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात मेहकर मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, संचेती ह्रदयालय हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल चिखली, साई बालरुग्णालय बुलडाणा आदी खाजगी कोविड रुग्णालय आहेत. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय बुलडाणा , सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, उप जिल्हा रुग्णालय मलकापूर, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा अशा एकूण १२ कोविड रुग्णालयात योजने अंतर्गत उपचार होतात. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यातील १२ रुग्णालयात एकूण ११२६ रुग्णांनी योजने अंतर्गत उपचाराची संजीवनी मिळाली आहे .
तसेच ४१६ रुग्णांनी श्वसन विकाराकरिता योजने अंतर्गत बाहेर जिल्ह्यातदेखील उपचार घेतला आहे. योजने अंतर्गत रेमदेसिवीर म इंजेकशन खर्च योजनेच्या पॅकेज मध्ये समाविष्ट नाही. तो खर्च रुग्णास करावा लागेल. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तक्रार नोंदणी व मदत म्हणून टोल फ्री नंबर १५५३८८ आणि १८००२३३२२०० वर संपर्क साधावा. तसेच ई-मेल वर तक्रार नोंदणीसाठी complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलचा उपयोग करावा.
वरील कोविड रुग्णालय यादी प्रमाणे जर आपले रुग्णालय ह्या मधील असेल तर ह्या सर्व रुग्णालयात प्रवेश घेताच आपणास योजनेचे आरोग्य मित्र कक्ष आहेत. या कक्षातही लिखित स्वरूपात तक्रारी नोंद करता येते. रुग्णालय जर योजने मध्ये अंगीकृत नसेल तर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे भरारी पथक यांना आपली तक्रार द्यावी. तसेच बाहेर जिल्ह्यातील खाजगी कोविड हॉस्पिटल असेल तर त्या जिल्ह्यातील भरारी पथकास आपली तक्रार द्यावी .योजने अंतर्गत नॉन कोविड आजारांवर देखील उपचार करण्यात येतात.

ही आहेत रुग्णालये

अमृत हृद्यालाय बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, आस्था हॉस्पिटल मलकापूर, सोनटक्के बाल रुग्णालय खामगाव, माउली डायलिसिस सेन्टर शेगाव, राठोड हॉस्पिटल मेहकर, धनवे बाल रुग्णालय चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली, सिल्व्हर सिटी खामगाव. तसेच केवळ डायलिसिस रुग्णांकरिता सुविधा ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद व ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल ता. संग्रामपूर येथे आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here