Home दुःखद बातमी भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ दांडगे यांचे कोरोनाने निधन

भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ दांडगे यांचे कोरोनाने निधन

२२ दिवसापासुन कोरोनाशी सुरू होता संघर्ष

खामगाव : भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते विश्वनाथ दांडगे यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले .गेल्या २२ दिवसा पासून त्यांचा कोरोना शी संघर्ष सुरु होता . आधी आई साहेब मंगल कार्यालय येथील कोविड सेंटर मध्ये दांडगे यांचेवर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना शासकिय रूग्णालयात पुढिल उपचारार्थ दाखल केले होते त्यानंतर त्यांचा रिपोर्ट्स निगेटिव्ह आला. परंतु आज येथिल सिल्वर सिटी रुग्णालयांमध्ये अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी १९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकिय चळवळ चळवळीत काम केले.अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याना त्यानीपंचायत समिती आणि जिप मध्ये निवडूण आणले. आंबेडकरी चळवळीत त्यांनी शेवटपर्यत काम केले.त्यांच्या पश्चात दोन मुले ,सुना व नातवंडे आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here