Home Breaking News शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वंचित आघाडी आक्रमक; दिला हा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वंचित आघाडी आक्रमक; दिला हा इशारा

खामगाव :येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २८ मे रोजी शेतमाल खरेदी करत असताना त्यांची आर्थिक लूट होत असल्याने शेतकऱ्यांचे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा विरोध दर्शवला. कमी भावात शेतमालाची विक्री होत असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तेव्हा हमीभावाने भुईमूग खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी करण्यात आली. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती भुईमूग शेग विकण्या करीत आणला असता आधार भूत किमत ऐवजी ३ हजार ते ३२०० रुपये प्रति क्विंटल माल खरेदी करण्यास सुरवात केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झाला . सदर बाबीची तकार प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कडे केली असता . कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा उपाय योजना केली नाही . कारण कृषी उत्पन्न बाजार समिती व परवाना धारक व्यापारी यांची साटेलोटे असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक पीळवणूक करीत आहे, सद्यस्थितीत शेंगदाणा तेलाचे भाव २०० रुपये प्रति किलो तसेच शेंगदान्याचे भाव १२० रुपये किलो आहेत . शेतकऱ्यांना उत्पादना साठी सरासरी प्रति हेक्टारी ३५ ते ४० हजार रुपये उत्पादन खर्च आला असून त्यामध्ये निघणारे उत्पन्न हे प्रति हेक्टरी सरासरी ५ क्विंटल आहे . त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव मध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी अत्यल्प भावाने होत असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे . त्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे . व अप्रत्यक्ष रित्या शासन शेतकऱ्याना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांचा माल आधारभूत किमतीपेक्षा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, शेतकऱ्याचा शेतमाल सरळ पद्धतीने घेण्यात यावा यासह इतर मागण्यांचा सदर निवेदनात समावेश आहे. सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार,जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महासचिव ऍड. अनिल ईखारे,तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, शहराध्यक्ष धम्मा नितनवरे,नगरसेवक विजय वानखडे, राजेश हेलोडेमिलिंद हिवराळे, गोलू महंतो,गौतम नाईक, गौतम सुरवाडे,रहेमान खान, संजय गुरबानी यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here