Home Breaking News दारू, मटणाच्या पार्टीत झिंगलेल्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्यास पकडले ;दहा हजारांची लाचही घेतली

दारू, मटणाच्या पार्टीत झिंगलेल्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्यास पकडले ;दहा हजारांची लाचही घेतली

१० हजाराची लाच घेतल्यानंतरही पार्टी घेवून दारू मटणावर ताव मारतांना रंगेहाथ अटक

खामगाव: प्लॉटची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी १० हजार रुपये नगदी घेऊनही दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठ्याला बुलडाणा एसीबीच्या पथकाने २८ मे रोजी रात्री दारू मटणावर ताव मारतांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील रहिवासी ४२ वर्षीय तक्रारदाराने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली की, लाखनवाडा येथे कार्यरत मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर वय ५२ वर्ष रा. गजानन कॉलनी खामगाव व शिर्ला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव उखर्डा मोरे वय ३६ वर्ष रा. किन्ही महादेव खामगाव यांनी तक्रारदारच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी १० हजार रुपये व दारू मटण पार्टीची मागणी केली. तसेच १० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले, अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शुक्रवार दि.२८ मे च्या रात्री खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडी समोर मंडळ अधिकारी विलास खेडेकर व तलाठी बाबुराव मोरे या दोघांना दारू व मटणावर ताव मारताना व मेजवानीच्या स्वरुपात अनुचित लाभ मिळवितांना अटक केली आहे. यावेळी पथकाने शेतातून दोन इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ हस्तगत केले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.ही कारवाई बुलडाणा एसीबीचे पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, चालक नितीन शेटे, शेख अर्शद यांनी केली आहे.चौकट -लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहनकोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा संपर्क क्रमांक 8888768218, व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here