Home Breaking News पुणे येथे गोळीबार; पिस्तुल पुरवणारा आरोपी शेगावचा, पोलिसांनी केली अटक

पुणे येथे गोळीबार; पिस्तुल पुरवणारा आरोपी शेगावचा, पोलिसांनी केली अटक

शेगांव (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून पुणे येथील खडकवासला जवळील कोल्हेवाडीत कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करण्याचा प्रकार काल घडला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अक्षय उर्फ रावण चंद्रकांत दुबे (रा.कोल्हेवाडी) असे अटक केली असून आरोपीला पिस्तूल हि शेगावच्या एक मित्राने पुरवली असल्याची कबुली दिल्यावरून आज शुक्रवारी पुणे पोलिसांनी शेगावात पोहचून आरोपीच्या मित्राला अटक केली. रवींद्र रमेश खेडकर असे शेगावातून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुरुवारी पुणे येथील खडकवासला भागात एकतर्फी प्रेमातून गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे घडली आहे. आरोपीने कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी अक्षय चंद्रकांत दुबे याला हवेली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेत वापरलेली देशी पिस्तूल हि शेगावच्या एका मित्राने आपल्याला 45 हजार रुपयात विकल्याचे कबुली दिल्या नंतर आज पुणे शहरातील हवेली पोलीस स्टेशनचे पथक शेगावात पोहचले यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत पिस्तूल विकणारा मित्र रवींद्र रमेश खेडकर याला ताब्यात घेऊन पुण्याकडे रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here