Home Breaking News दिड वर्षीय मुलासह पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

दिड वर्षीय मुलासह पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

(या घटनेतील फोटो मन विचलीत करणारा असल्याने प्रकाशित केला नाही)

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कुंदेगाव येथील २६ वर्षीय वडिलाने दिड वर्षीय मुला सह स्वताच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने समाज मन सुन्न झाले असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे निरागस दिड वर्षीय मुलाला वडीलानेच रागाच्या भरात गळफास देवून स्वतःची आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुंदेगाव येथे दिनांक २८ मे च्या सकाळी उघडकीस आली अंदाजे २६ वर्ष वय असलेल्या मृतक पित्याचे नाव दिनेश पुंडलीक वानखडे व दिड वर्षीय पुत्राचे नाव रोशन आहे पती पत्नीच्या वादात दिड वर्षीय चिमुकल्याला जिवास मुकावे लागल्याने सदर दुदैवी घटनेमुळे समाज मन सुन्न झाले तालुक्यात खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि तालुक्यातील कुंदेगाव येथील दिनेश पुंडलिक वानखडे वय २६ वर्ष यांनी स्वतःच्या दीड वर्षीय रोशन नावाच्या मुलाला स्वतःला कुंदेगाव शिवारातील वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला वडील दोरीच्या सहाय्याने तर दीड वर्षीय चिमुकला दुपट्ट्याच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.काल दिनांक २७ मे रोजी दिनेश वानखडे हा सासरवाडीत काकनवाडा येथे गेला होता तेथे पती-पत्नी मध्ये वाद होऊन आज दि.२८ मे रोजी पहाटे अंदाजे ४.३०वा.दरम्यान दिड वर्षीय चिमुकल्याला वडील दिनेश घेऊन गेला असता त्यावेळी मृतक दिनेशच्या पत्नीने सासरे पुंडलिक वानखडे यांना दुरध्वनी वरुन विचारण केली तुमचा मुलगा व नातू घरी पोहोचले काय दिनेशच्या नातलंगानी घरी व परिसरात शोध घेतला असता मिळुन आले नाही दि.२८ मे रोजी सकाळी त्यांचेच शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले पती पत्नीच्या वाद झाल्यामुळे रागाच्या भरात निघून जावून दीड वर्षीय चिमुकल्या सह पित्याने आत्महत्या केल्याची जन चर्चा आहे. सदर घटनेची माहिती पातुर्डा पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करुन त्या चिमुकल्याचे व मृतकाचे प्रेत शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तामगाव पो स्टे दुय्यम ठाणेदार श्रीकांत विखे यांच्या मार्ग दर्शनात पुढील तपास बीट जमादार नंदकिशोर तिवारी करित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here