Home कोरोना अपडेट्स कोरोनापासून लहान मुलांची अशी घ्या काळजी

कोरोनापासून लहान मुलांची अशी घ्या काळजी

शेगाव- कोरोना ची तिसरी संभाव्य लाट लहान मुलांमध्ये येणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे त्यासाठी ची उपाय योजना म्हणून इन्फ्लूएंजा व निमोनिया च्या लसी लहान मुलांना द्याव्यात असे कोविड टास्क फोर्सने सुचवले आहे. बऱ्याच अंशी लहान मुलांमध्ये कोरोना हा सौम्य स्वरूपाचा आजार असणार आहे त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही मात्र योग्य ती काळजी नक्की घ्यावी. सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब,भूक मंदावणे , अशक्तपणा, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या बालरोग तज्ञ यांचा सल्ला घ्यावा. अगदी गरज असेल तेव्हाच लहान मुलांना घरा बाहेर काढा सोशल डिस्टन्स चे पालन करा व नियमित हात धुवा
वर उल्लेख केलेल्या लसींचा कोरोना विरुद्ध संरक्षणात्मक उपयोग हा संशोधनाचा विषय आहे, परंतु इन्फ्लुएन्झा व निमोनिया या दोन्ही आजाराचे लक्षणे कोरोना सारखीच आहेत. त्यामुळे अनावश्यक चाचण्या तसेच रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण टाळण्याकरिता या लसींचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे. यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या लसीं तत्वतः फायदेशीर ठरणार आहेत.

इन्फ्लुएन्झा ची लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या लसींचा भाग नाही ही लस सहा महिन्यापासून ते नऊ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दोन डोज च्या स्वरूपात दिली जाते, नऊ वर्षावरील बालकांमध्ये एक डोज पर्याप्त आहे.
या लसीची किंमत 1400 ते 2000 रुपये आहे.

-डॉ तुकाराम पाटील अढाव
(बालरोग तज्ञ)
मुक्ताई बालरुग्णालय, एम एस ई बी चौक खामगाव रोड, शेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here