Home कोरोना अपडेट्स कोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी

कोरोनाबाबत ही दिलासा देणारी बातमी

 

बुलडाणा,दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3401 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2974 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 427 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 346 व रॅपीड टेस्टमधील 81 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 2029 तर रॅपिड टेस्टमधील 945 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2974 अहवाल निगेटीव्ह आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात 427 रूग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जळकी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील 55 वर्षीय महिला, चिखली येथील 50 वर्षीय महिला, जय अंबे नगर शेगाव येथील 61 वर्षीय पुरुष, माळवंडी ता.बुलडाणा येथील 40 वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला, पि. देशमुख ता. खामगांव येथील 70 वर्षीय पुरुष, आंबे टाकळी ता. खामगांव येथील 85 वर्षीय महिला, इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरुष, चिखली येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 509 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 451528 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 77494 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 77494 आहे.
आज रोजी 2720 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 451528 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 82763 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 77494 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4702 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 567 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आता कोरोनाची आकडेवारी कमी होत असून उपचार घेत असलेलं रुग्ण व नवीन रूग्ण संख्या अर्ध्यावर आली आहे. आपण असेच खबरदारी घेत राहिलो तर नक्कीच कोरोना हद्दपार होईलच! मास्क वापरा, गर्दी टाळा , सुरक्षित अंतर ठेवा आणि आरोग्य विषयक सूचनाचे पालन करा, म्हणजे आपण ही लढाई नक्कीच जिंकनार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here