Home Breaking News दुसरे लग्न करण्यासाठी पतीने मागितला घटस्फोट;विवाहितेचा छळ

दुसरे लग्न करण्यासाठी पतीने मागितला घटस्फोट;विवाहितेचा छळ

नांदुरा: तालुक्यातील वडनेर भोलजी येथील विवाहीतेलचा तीने घटस्फोट द्यावा व दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा करावा यासाठी पुणे येथे तीच्या सासरी तीचा पती व इतर चार आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार 22 मे रोजी नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली असुन पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सवीस्तर हकीकत अशी की वडनेर भोलजी माहेर असलेल्या विवाहितेने नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये अशी तक्रार दिली की त्या महीलेचा पती सचीन मधुकर ठाकरे, दिर नितीन मधुकर ठाकरे,रा.कार्ला जी अकोला ह.मु पुणे तसेच सासरा मधुकर मारोती ठाकरे सासु वंदना मधुकर ठाकरे.‌रा.कार्ला ता.तेल्हारा.ननंद ‌सारीका सुशील लाहुडकार रा .लोहारा ता. बाळापूर यांनी पिडीतेचा एक वर्षाआधी सचीन ठाकरेसोबत विवाह झाल्यानंतर लगेच शारीरिक व मानसिक छळ करणे सुरू केले. सचीन ठाकरेला दुसर्या मुलीसोबत विवाह करावयाचा असल्यामुळे माझ्यावर विनाअट घटस्फोट द्यावा यासाठी दबाव टाकणे सुरु केले पती व दिर यांनी दारुच्या नशेत जिवे मारण्याची धमकी दिली व इतर तीन आरोपी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करतात.तक्रारदार महीला माहेरी आल्यानंतर फोनवर सदर महीला व तीचे माहेरचे नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली .या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये सदर पाच जणांविरुद्ध अ.प.नं 266/2021कलम 498 अ 323,504,506 109,114 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here