Home Breaking News शेगाव शहर पोलीसांची जुगार खेळणाऱ्यांवर धडक कार्यवाही; प्रतिष्ठित पकडले

शेगाव शहर पोलीसांची जुगार खेळणाऱ्यांवर धडक कार्यवाही; प्रतिष्ठित पकडले

 

शेगाव- आज दि. २३ मे रोजी मिळालेल्या गुप्त बातमीचे आधारे शेगाव शहरचे पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे व पोस्टाफ सफौ. लक्ष्मण मिरगे, पो.ना.गणेश वाकेकर, पो.ना.उमेश बोरसे, पोकॉ विजय साळवे, पोका प्रकाश गव्हांदे, पोको हरीचंद्र बारवाल, पोस्टे शेगाव शहरचे ठाणेदार श्री ताले साहेब यांचे नेतृत्वात बाळापुर रोडवरील वनविहार ढाव्याचे मागील परीसरातील जंगलातील नाल्यात ताशपत्ता जुगार खेळणारे इसमांवर रेड केली असता त्यामध्ये आरोपी अनंता प्रल्हाद चव्हाण वय 45 वर्ष रा. रोकडीया नगर शेगाव, 2) विष्णु समाधान निळे वय 37 वर्ष रा. सिरजगाव निळे 1) ता.शेगाव, 3) श्रीकृष्ण महादेव चारोळे वय 43 वर्ष रा.ताडी शेगाव, 4) श्याम तुळसीराम नेमाडे वय 45 वर्ष रा.डोंगरगाव ता.बाळापुर जि. अकोला, 5) शिवशंकर शेषराव शेजोळे वय 45 वर्ष रा.येवुलखेड ता.शेगाव जि. बुलडाणा, 6) समीर जगन्नाथ मोरे वय 44 वर्ष रा. साईनगर शेगाव, 7) महेंद्र कैलास अग्रवाल वय 30वर्ष रा. कुंभारवाडा शेगाव, 8) प्रदिप लक्ष्मण गटमणे वय 34 वर्ष रा. अळसणा रोड शेगाव, 9) महेश वासुदेव पटोकार वय 35 वर्ष रा.एस बी आय कॉलनी शेगाव, 10) अनिल साहेबराव वक्टे वय 36 वर्ष रा. रोकडीया नगर शेगाव यांना अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन नगदी व 06 मोबाईल, 07 मोटार सायकली असा जुगार साहीत्यास एकुण 4,14,410/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. वरुन आरोपीतांविरुध्द कलम १२ अ म.जु.का. सह कलम १८८,२६९,२७० भादवी, सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, सह कलम ३ साथरोग अधि. १८९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. श्री ताले साहेब ठाणेदार पो.स्टे. शेगाव शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे व पोस्टाफ सफी लक्ष्मण मिरगे, पो.ना.गणेश वाकेकर, पो.ना.उमेश बोरसे, पोकॉ विजय साळवे, पोकॉ प्रकाश गव्हांदे, पोको हरीचंद्र बारवाल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here