Home अपघात दुचाकींची अमोरा समोर जबर धडक तीन जण गंभीर जखमी

दुचाकींची अमोरा समोर जबर धडक तीन जण गंभीर जखमी

मलकापूर:- बुलढाणा रोडवर ग्राम निंबारी फाट्यानजीक दोन दुचाकींची अमोरासमोर जबर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडे सात वाजे दरम्यान घडली आहे.या अपघातात दोन्ही दुचाकी व जख्मी रोडवर बराच वेळ पडून असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, गंभीर जख्मींना घटनास्थळी उपस्थित सागर बेलोकार, नितेश काकडे,चेतन टेकाडे, अमोल टप, संदीप राजपुत आदींनी निमखेडचे सरपंच प्रविण क्षिरसागर यांच्या खाजगी गाडीतुन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम शिराढोण येथील गजानन नामदेव पाटील हे त्यांच्या हिरो होंडा शाइन दुचाकी क्रमांक MH 28 BL 8223 दुचाकीने मलकापूर कडून शिराढोण कडे जात होते दरम्यान बुलढाणा येथून प्रवीण सुपडा वानखेडे वय 22, योगेश विजय मोरे वय 20 दोघे रा. वृंदावन नगर हे दुचाकी क्रमांक MH 28 AH  6848 युनिकॉन या दुचाकीने औषधी घेऊन बुलढाणा वरुन मलकापूर कडे येत असताना दोन्ही दुचाकींची निंबारी फाट्यानजीक अमोरासमोर जबर धडक झाली या धडकेत गजानन नामदेव पाटील यांच्या डोक्याला मार लागला तर प्रवीण वानखेडे, योगेश मोरे गंभीर जख्मीं झाल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात भरती केले अपघाताची माहिती मिळता बरोबर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष विरसिंहदादा राजपुत, राजेश इंगळे उपजिल्हा रुग्णालयात जख्मींच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देत शहर पोलिसांनाही अपघाताची माहिती पत्रकार ठोसर यांनी दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सिंह ठाकुर घटनास्थळी दाखल झाले,अपघातातील गजानन नामदेव पाटील रा.शिराढोण यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी जळगांव (खां) येथे हलविण्यात आले तर प्रविण वानखेडे, योगेश मोरे यांना डॉ.अरविंद कोलते यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सिंह ठाकुर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here