Home खामगाव विशेष खामगाव लगतच्या तिनीही मोठया ग्रापंचायतीमध्ये सरपंच बदलायच्या हालचालींना वेग ?

खामगाव लगतच्या तिनीही मोठया ग्रापंचायतीमध्ये सरपंच बदलायच्या हालचालींना वेग ?

 

सरपंचाच्या एककल्ली कारभाराला कंटाळून ग्राप सदस्य दाखल करणार अविश्वास ?

खामगाव : शहरालतग असलेल्या महत्त्त्वपूर्ण तिन ग्र्रामपंचायतीमध्ये संरपचाच्या मनमानी कारभाराला कटांळून ग्रामपंचायत सदस्य संरपच बदलाच्या तयारीत असल्याची खात्रीदायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या तिनही ग्राम पंचायतचे सदस्य संरपचाच्या कारभाराला कंटाळले असून त्यांनी याबाबतची तक्रार आपआपल्या पक्षाच्या नेत्याकंडे केली आहे. तिन महिन्यातच संरपचाच्या डोक्यात शिरलेले सत्त्तेचे वारे व त्यांचा सुरु असलेल्या कारभाराबाबत तक्रार करुन नेत्यांकडे संरपच बदलविण्याची गळ घातली आहे ?. नेत्यांनी जर एकले नाही तर सर्व ग्राप सदस्य मिळून आणखी तिन महिन्यानंतर अविश्वास ठरावाच्या माध्यमातून संरपचांना खुर्ची वरुन खाली खेचण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
खामगाव शहरानजीक असल्याने या तिनही ग्रामपंचायतीना राजकीय दृष्टया अनन्य साधारण महत्त्त्व आहे. या ग्रामपंचायतींचे उत्पन्न सुद्धा इतर ग्रामपंचायतीच्या तुलतेत अधिक आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये सत्त्तेत आलेले सर्वच सदस्य कारभारावर लक्ष ठेवून असतात. सर्वांना सोबत घेवून काम करणारा संरपच असल्यास सर्व कारभार सुरळीत चालतो. मात्र मागील तिन महिन्यापुर्वी खुर्चीवर बसलेले संरपच इतर सदस्यांना विश्वासात न घेता आपला मनमानी कारभार करीत असल्याची कुजबुज सदस्यांमध्ये दिसून येते. याबाबत सर्व सदस्यांनी आपआपल्या पक्ष श्रेष्ठीकडे संरपच काम करीत नाहीत, काम केल्यास इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. याबाबतच्या इतरही तक्रारी केल्या आहेत. आणि लवकरात लवकर संरपच बदलण्याची गळ पक्ष श्रेष्ठींकडे घातली आहे. संरपच वगळता सत्त्तेतील व विरोधी सदस्य गुप्त बैठका घेत असून या तिनही ग्रामपंचयातीमध्ये संरपच बदलीच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सध्या रंगत आहेत. संरपचाचा सहा महिन्याचा कार्यकाळ पुर्ण झाल्याशिवाय अविश्वास ठराव दाखल करता येत नसल्यामुळे हे सर्व सदस्य वेळ येईपर्यंत शांत बसून वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भुमिकेत असल्याचे काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटिवर सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत शहरालगतच्या तिनही ग्रामपंचातीमध्ये लवकरच संरपच बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सांज दैनिक सांज सावली ने याबाबत वृत्त प्रकाशित केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here