Home कोरोना अपडेट्स ही लस करणार कोरोनाचा सामना!

ही लस करणार कोरोनाचा सामना!

कोरोना विषाणू हा विषय जागतिक पातळीवर त्रासदायक ठरत असल्याने विविध तज्ज्ञांनी संशोधन सुरू आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या लसी वापरल्या जात आहे. यापैकी एक महत्त्वाची लस म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या एस्ट्रोजेनेका म्हणजेच कोव्हिशील्ड लस असे सांगितले जात आहे.

बुस्टर डोसने अँटीबॉडी रिऍक्शन तयार केल्याचं पाहायला मिळालं असा दावा सुद्धा केल्या जात आहे.त्यामुळे कोरोनाच्या कोणत्याही व्हॅरिएंटचा सामना करण्यास शरीर सक्षम होईल, असं ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आगामी काळात नागरिकांना दरवर्षी कोरोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागेल असं म्हटलंय. पुढील काळात कोरोनाचे आणखी घातक नवे विषाणू येतील. त्यांचा सामना करण्यासाठी हे बुस्टर डोस आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. फायझर कंपनीने देखील कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारतात सध्या दोन टप्प्यात लसीकरण सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here