Home Breaking News “त्या”नेत्यांना लवकरच आमदारकी; एकनाथ खडसे मंत्री होणार?

“त्या”नेत्यांना लवकरच आमदारकी; एकनाथ खडसे मंत्री होणार?

मुंबई : विधान परिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस ६ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या या शिफारसीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या १२ सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने उपस्थित काल केला. तसेच याबाबत राज्यपालांच्या सचिवांना विचारणाही केली. त्यामुळे आता यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीकडून नावांची शिफारस केलेले चे एकनाथ खडसे, राजू शेट्टी(Raju Shetti), शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर(Urmila Martondkar) यांचे आमदारकीचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढं यासंबंधीच्या याचिकेवर काल सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व प्रतिवादींना दोन आठवड्यांत याचे उत्तर देण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले. राज्यपाल कोश्यारी यांच्या सचिवांना प्रतिवादी करण्याची मुभाही याचिकादार सोली यांना देण्यात आली आहे. याबाबतची पुढील सुनावणी ९ जूनला होणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह बारा जणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांसाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे, काँग्रेसकडनं रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर यांची तर शिवसेनेकडनं उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. ही नावे आता फायनल होणार असून यात एकनाथ खडसे, राजू शेट्टी, या मोठ्या नेत्यांना मंत्रीपद सुद्धा मिळेल असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here