Home Breaking News घरून काही न सांगत मनमिळाऊ रामहरी बाहेर गेले आणि असं विपरीत घडलं

घरून काही न सांगत मनमिळाऊ रामहरी बाहेर गेले आणि असं विपरीत घडलं

महादेव राऊत

शेगांव:शहरातील जगदंबा नगर येथील रहिवाशी रामहरी पांडुरंग बघेवार वय अंदाजे 50 यांनी गौलखेड रोड, आय टी आय कॉलेज च्या मागे, शिव नगर शेगांव येथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामहरी पांडुरंग बघेवार हे खुप मनमिळवू आणि सद्या व्यक्ती महत्वाचे व्यक्ती होते. जो मिळेल तो काम धंदा करून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करीत होते. पण आज दि.22/05/21ला त्यांनी घरी कोणाला न सांगता 11वाजता घरून निघून गौलखेड रोड आयटीआय कॉलेज च्या मागे शिव नगर परिसरामध्ये स्वतःच्या रुमालाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
काही जवळील निकट वर्तियान कडून असे समजले जात आहे की त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी विवाहित व पत्नी असा आप्त परिवार आहे
मृतक रामहरी पांडुरंग बघेवार अंदाजे वय वर्ष 50 राहणार जगदंबा नगर शेगाव यांनी आयटीआय कॉलेज च्या मागे शिवनगर भागामध्ये एका झाडाला स्वतःच्या गळ्यातील रुमाल झाडाला बांधून 12.30 वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली
फिर्यादी सोपान रामहरी बाघेवार वय वर्षे 23 यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये येऊन तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतकाच्या मृतदेह हा पोस्टमॉर्टम करिता सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे पाठवण्यात आला आहे पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल करून मार्ग क्रमांक 20/21 दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्याम पाटील साहेब हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here