Home युथ स्पेशल एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून मानवतेचे दर्शन

एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून मानवतेचे दर्शन

 

खामगांव:- गौ-सेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून वेगवेगळ्या घटनेत गंभीर जख्मी झालेल्या गौ-वंश वर एकनिष्ठा गौ-सेवकांनी ४ गायीवर उपचार करून ३ वर केले अंतिम संस्कार तर एकाला दिले जीवनदान मिळाले. सविस्तर हकीकत अशी आहे की तिलक मैदान भाजी मंडी स्थित एक लहान वासरू अपघातामुळे कंबरे मधून पूर्णपणे निकामी झालेले होते अनोळखी गौ धारकाने त्या वासरूला बेवारस स्थितीत सोडून देऊन पोबारा केला होता.

घटनेची माहिती मिळताच गौ-सेवक पोहचले असता वासरूचे लचके कुत्र्यानी तोडलेले होते गौ-सेवकांनी कुठलाही विलंब न करता लगेच खामगांव येथील गौरक्षण संस्थान मध्ये वासरूला दिले सध्या वासरूवर डॉ उपचार करत आहे त्याची प्रकृती सुरळीत आहे. वाडी स्थित पॉलिटेक्निक होस्टेल समोर एका गाईला विषबाधा झाली होती डॉ ला बोलावून उपचार केला परंतु ती गौ गतप्राण झालेली होती गाई तिच्या मालकाच्या स्वाधीन करून अंतिम संस्कार करण्यात आले. सामान्य रुग्णालयात एका गौ ला सर्पदंश झाल्यामुळे ति तरफडत होती तिच्यावर उपचार करण्यात आले परंतु ती गतप्राण झाली. रेलवे गेट साई नगर वाडी स्थित एक गौ एका अनोळखी निर्दयी गौ धारकाने मृत अवस्थेत टाकून दिली होती घटनेची माहिती मिळताच तिच्या अंतिम संस्कार करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली. सर्व घटना लक्ष्यात घेता सुरजभैय्या यादव यांनी त्रिव नाराजी व्यक्त केली व पुढे गौ धारकांच्या हलगर्जी मुळे गौ-वंश धोक्यात आहे असे उपस्थित गौ-सेवकांना संबोधित केले. या गौ-सेवेत जितेंद्र कुलकर्णी, सतिष मोरे, प्रवीण खोंड, डॉ विवेक जोशी, दत्ता आमले, हर्षल खेडकर, करण परियाल, दिपक शर्मा, सत्येंद्र थानवी, रामा वाघ, सोनू ठाकुर, दिलीप चौधरी, विनोद नाईक, गोपाल पवार, अशोक कोरडे, रोशन शर्मा, कृष्णा गवळी, सुरज लहासे, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, विशाल यादव, सागर हराळ, गणेश अपार, ज्ञानेश्वर हाड़े, तिवारी, आदि गौ-सेवकांनी वर्गनी गोळा करून गौ-वंश वर उपचार करून अंतिम संस्कार करून एकाला दिले जीवनदान अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here