Home खामगाव तालुका ‘या’संघटनेनं केली परमवीर सिंग यांच्या अटकेची मागणी

‘या’संघटनेनं केली परमवीर सिंग यांच्या अटकेची मागणी

 

खामगाव : मुंबईचे ठाणेदार भीमराव घाडगे यांनी परमविरसिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी परमविरसिंग यांच्यावर ऍक्टरसिटी गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यात परमविरसिंग यांना अटक करावी अशी मागणी तथागत एकता फाउंडेशनने केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परमवीर सिंह यांनी भीमराव घाडगे हे मागासवर्गीय अधिकारी असल्याने त्यांना जातीवाचक शिविगाळ करून खोटा गुन्हा दाखल केला व दोन महिने कारावासात पण ठेवले.एवढ्यावरच न थांबता त्यांच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल करून नवी मुबई येथील तळोजा जेल मध्ये एकवर्ष दोन महिने अंडा सेलमध्ये ठेवले होते.

ज्या खोट्या गुन्ह्यात परमविरसिंग आणि त्यांच्या पत्नीला अडकवले होते,त्या गुन्ह्यात न्यायालयाने बरी केले होते.आता या प्रकरणी परमविरसिंग यांच्यावर ऍक्टरसिटी गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यात परमविरसिंग यांना अटक करून मागासवर्गीयां समाजाच्या भीमराव घाडगे यांना न्याय देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन तथागत एकता फाउंडेशन खामगाव जि. बुलढाणा चे अध्यक्ष संजय गवई यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिले.
यावेळी त्यांच्या समवेत आनंद तायडे,रामदास गवई, प्रकाश हिवराळे,रवींद्र वानखडे,भिमराव तायडे,मयुर वानखडे,गौतम तायडे,संजय बोराडे,अंकित सदांशीव,मिलिंद सरदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here