Home आंदोलन २४ मे रोजी आशा व गटप्रवर्तकांचा देशव्यापी संप

२४ मे रोजी आशा व गटप्रवर्तकांचा देशव्यापी संप

कॉ.पंजाबराव गायकवाड यांची माहिती
खामगाव: येत्या २४ मे रोजी आशा व गटप्रवर्तकानी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी केलं आहे.

कोविड-१९ या संसर्गजन्य भयानक महामारीचा आपल्या देशात गेल्या २०२० मध्ये शिरकाव होऊन आज त्याला जवळपास दिड वर्षे होत आहे.तेव्हा पासून आपण आशा व गटप्रवर्तक एक योद्धा, एक सैनिक म्हणून राज्य रात्रदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता विना मास्क,सँनिटाईझर, ग्लोज,पीपीई किट इत्यादी कुठलेही सुरक्षिततेची साधने नसताना तसेच विना मोबदला विशेष म्हणजे कुठलाही आरोग्य विमा नसताना अशा गंभीर परिस्थितीत सातत्याने जी जबाबदारी मिळेल ते काम करित आहोत.
सरकाने आम्हाला सुरक्षा किट,आरोग्य कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन,विमा संरक्षण,करोणा लसीकरण ५००/-रू.करोणा सर्वेक्षण भत्ता ३००/-रू. आणि मागील वर्षीचे नोव्हेंबर पासून राज्य सरकारने जाहीर केलेले २ हजार आणि ३ हजार रूपये थकित मानधन ताबडतोब देण्यात यावे.ह्या प्रमुख मागण्या घेऊन सीटूच्या नेत्रुत्वात दिनांक २४ मे रोजी एक दिवशीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात बुलडाणा जिल्ह्यातील १००% आशा व गटप्रवर्तकांनी सहभागी होऊन हा संप यशस्वी करून आपल्या मागण्या सरकारकडून मंजुर करून घेण्यासाठी प्रचंड दबाव आणावा.असे आवाहन बुलढाणा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्ष रश्मी दुबे,सचिव मंदा मसाळ,चंदा झोपे,ललिता बोदडे,सुरेखा पवार, विजया ठाकरे,कविता चव्हाण शांता हिंगे,नलिनी गोरे, अनिता कदम,अलका राजपूत, वर्षा शेळके,उषा पडोळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here