Home Breaking News साहेब मी पत्नीला मारलं…मध्यरात्री ठाण्यात येवून दिली कबुली

साहेब मी पत्नीला मारलं…मध्यरात्री ठाण्यात येवून दिली कबुली

 

 

 

 

 

महादेव राऊत / प्रतिनिधी

शेगाव – आरोग्य कॉलनीत पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना 19 मे रोजी सायंकाळी 7 वाजता सुमारास घडली.पत्नीला ठार मारल्यानंतर  पतीने मध्यरात्री दरम्यान स्वतःहून पोलिसात जाऊन घटनेची खबर दिली पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले मिळलेल्या माहितीनुसार स्थानिक आरोग्य कॉलनीत आरोपी शिवाजी कैलास आढाव वय अंदाजे 32 वर्ष रा काकनवाडा तालुका संग्रामपुर हा पत्नी सौ संजीवनी 22 वय तिच्या समवेत भाड्याने खोली करुन राहत होता आरोपीने रागाच्या भरात पत्नीला संजीवनी हिचा उशीने नाक तोंड दाबून ठार मारले त्यानंतर मध्यरात्री सुमारास त्याने स्वताहून शहर पो. स्टे.ला आत्मसमपण केले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आणि घटनास्थळ पोहचुन मृतक महिलेचा मृतदेह उतरीय तपासणीसाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पाठविला पोलिसांनी रात्री 2.30 वाजता सुमारास दहीहंडी पो. स्टे. अंतर्गत येणाऱ्या कावसा ता. अकोट येथील मूतकाच्या माहेरच्याना कळविल्यानंतर माहेरकडील नातेवाईक रुग्णालयात पोहोचले घटनेसंदर्भात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आरोपी व त्यांची मुलगी मुतक संजीवनी ह्यांचा प्रेम विवाह झाला होता मात्र आरोपी हा दारूडा असल्याने तो त्यांच्या मुलीला नेहमी त्रास देऊन मारहाण करीत होता या आधी सुद्धा पोलिसात तक्रार दिल्याचे ही मूतकचा मामेभाऊ विनोद दादाराव बोंद्रे यांनी सांगितले आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.खंडारे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here