Home कृषि वार्ता शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्यावा : सुरेश गव्हाळ

शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्यावा : सुरेश गव्हाळ

 

खामगाव – सन २०२० च्या खरीप हंगामाची पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. प्रचंड सततचा पाऊस ,अतिवृष्टिमुळे जमीनी खरडुन गेल्या कोणतेही पिक हाती आले नाही. नगदी पिके सोयाबीन ,मुंग ,उळीड ,कापूस इत्यादी पिके नष्ट झाली. ओला दुष्काळाची झळ सर्वच शेतकऱ्यांना पार धुळीस मिळवून गेली. तालुक्यातील अंतिम आणेवारी सुद्धा ४७ पैसे शासनाने ठरवली एवढे सर्व निकशात बसुन सुद्धा दुष्काळी मदत , पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. आता येणारा खरीप हंगाम डोळ्यासमोर आहे. १५ ते २० दिवसात मान्सून जर वेळीच आला तर पेरण्या सुद्धा सुरु होतील येणाऱ्या पेरणी करिता ती फार मोठी मदत शेतकऱ्यांना होईल कारण एकीकड़े दुष्काळ अण दुसरीकडे कोव्हीड-१९ चे महाभयंकर संकट ,शेतकऱ्यांना या रोगातुन बरे होण्यासाठीचा आलेला दवाखानेचा प्रचंड खर्च असे फार मोठ-मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे. त्याला धीर देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. तरी राज्य शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार द्यावा. शेतकरी फार मोठ्या संकटात उभा आहे. तरी सरसकट शेतकऱ्यांना ज्यांनी विमा काढला असेल व ज्यांनी विमा काढला नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करावा, असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here