Home Breaking News काँग्रेस सेवादलाच्या मागणीला यश – कृषी विषयक आस्थापने उद्यापासून सुरू

काँग्रेस सेवादलाच्या मागणीला यश – कृषी विषयक आस्थापने उद्यापासून सुरू

 

खामगाव : खरिप पिकाच्या लागवडीची कामे शेवटच्या टप्प्यात असतांना कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये ‘ब्रेक द चेन’ नुसार कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते, त्यानुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे व मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना निवेदन देऊन बँका व शेती निगडित आस्थापने तातडीने सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती.
काँग्रेस सेवादलाच्या या मागणीला यश आले असून उद्यापासून सकाळी 9 ते 4 या वेळेमध्ये कृषी केंद्रे व शेती निगडित आस्थापने सुरू राहतील व सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये बँकाचे कामकाज सुरू होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप पिकाच्या लागवडीला आता गती मिळणार आहे. तसेच भाजीपाला ठोक विक्री सुद्धा सकाळी 3 ते 6 यावेळेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती टोकन पद्धतीने उद्यापासून सुरू होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here