Home जागर पिठोरे परिवाराकडून तेरवीचा खर्च पर्यावरणाच्या कार्यासाठी दान

पिठोरे परिवाराकडून तेरवीचा खर्च पर्यावरणाच्या कार्यासाठी दान

खामगाव : तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे यांच्या मातोश्री पार्वताबाई हिम्मतराव पिठोरे यांचे वृद्धापकाळाने १ मे रोजी निधन झाले होते. सध्या सुरु असलेला कोरोना काळ लक्षात घेत पिठोरे परिवाराने तेरवी घरगुती पद्धतीने करत त्यांच्या आई च्या स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरणाच्या कार्यासाठी ३१ हजार रुपयांचा निधी प्रदान केला. सध्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नागरिकांच्या आरोग्याची परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे. त्यामुळे आताच पुढाकार घेऊन वृक्षारोपण, संवर्धन ह्या बाबीला प्राधान्य देण्याची गरज आहे याची जाण ठेवत तरुणाई फाउंडेशनच्या सुरु असलेल्या पर्यावरणाच्या कार्यासाठी मधुकर पिठोरे व नारायण पिठोरे बंधूनी दान देऊन आदर्श निर्माण केला.
सध्याच्या काळात स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र ही शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी केवळ औषधें, इम्युनिटी बूस्टर घेऊन कामाचे नाही. आपले वातावरण प्रदूषणमुक्त बनविणे, रसायनमुक्त भाजी व अन्नधान्य खायला मिळणे आणि सर्वात महत्वाचे निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. ह्या सर्व बाबीवर तरुणाई फाउंडेशनचे सातपुड्यातील सालईबन येथे कार्य सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन झोन लोकसहभागातून निर्माण करण्याचे काम सुरु आहे. या कार्याला पिठोरे परिवारासारख्या सजग नागरिकांकडून मिळणाऱ्या योगदानामुळे बळ मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here