Home Breaking News आकाश दादांच्या मुळे प्रेरणा मिळाली आणि केलं महान कार्य

आकाश दादांच्या मुळे प्रेरणा मिळाली आणि केलं महान कार्य

खामगाव भाजप युवा मोर्चाच्या वतिने गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात सामान्य रुग्णालय खामगाव येथे मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाजप युवा मोर्चा पदाधिकारी प्रतिक झुनझुनवाला याने आपले आई वडिल श्री.रमेशचंद्रजी व सौ.मीनाक्षीदेवी रमेशचंद्रजी झुनझुनवाला यांच्या लग्नाच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त व अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज सामान्य रुग्णालयात विविध साहित्याचा पुरवठा केला.

यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी झुनझुनवाला परिवाराचे आभार मानले व ते म्हणाले की,”प्रतिक व झुनझुनवाला परिवाराचे मी मनापासून कौतुक करतो व त्यांनी दाखवलेले दातृत्व खरोखर सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे.

झुणझुणवाला परिवारातर्फे देण्यात आलेल्या मदतीत सर्जिकल मास्क १००० पीस,६०मिली. सेनिटाइजर स्प्रे 1 पेटी, ७५नग १०० मिली. सेनिटाइजर स्प्रे १ पेटी, १२५ नग तापमान चेक मशीन(गन )-१, १ लिटर सेनिटाइजरच्या ५ कॅन, वाफ वाली मशीन – २ नग फेस शिल्ड – ८ नग एन -९५मास्क -७० नग ऑक्सिमिटर(ऑक्सीजन चैक करण्याची मशीन -१ नग इत्यादी अत्यावश्यक उपकरणे व साहित्याचा समावेश आहे.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.निलेश टापरे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री.संजय शिनगारे, बजरंग दलाचे विभागीय संयोजक श्री.अमोल अंधारे, युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष श्री.राम मिश्रा, युवा मोर्चाचे शहर संघटक श्री.नगेंद्र रोहणकार, झुनझुनवाला परिवारातील श्री.मोहनजी अग्रवाल, प्रतिकचे बंधूद्वय श्री.नारायण झुनझुनवाला, श्री.गजेंद्र अग्रवाल उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here