Home Breaking News गायकवाड हे वाघ आहेत, पिंजऱ्यात अडकणार नाहीत

गायकवाड हे वाघ आहेत, पिंजऱ्यात अडकणार नाहीत

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका विधानावरून त्याना कोंडीत पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियावर सुरू आहे, पण संजय गायकवाड हे वाघ आहेत, ते पिंजऱ्यात अडकणार नाहीत,हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रोटीन मिळते असा आहार, मांसाहार करा असे आवाहन बुलढाणा येथील आ. संजय गायकवाड यांनी केले, त्यावर काहींना मिरची लागली. समाजाला अनेक वर्षे व्रत वैकले उपास तापास , कर्मकांड यात अडकून प्रगती पासून दूर ठेवले गेले. तेच हे लोक.

त्यावर सर्वात आधी जगतगुरु तुकाराम महाराज यांनी आवाज उठवला. अनिष्ट रूढी, परंपरा यावर प्रहार केला. नवसे कन्या पुत्र होती, मग का करने लगे पती या अभंग असो की कलियुगी संत झाले फार, वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार अशी परखड अशा शब्दांत तुकाराम महाराज यांनी प्रहार केला. मात्र काही सन्मानीय अपवाद सोडले तर आज विचित्र परिस्थिती आहे. हे सर्व मांडण्याचा हेतू हाच आहे की आमदार संजय गायकवाड यांना एका वक्तव्यावरून  टार्गेट केले जात आहे,धर्माचा ठेका घेतलेल्या लोकांना माणसं मरत आहेत ते दिसत नाही, मात्र त्यांचे संधी साधू राजकारण सुरू आहे, पण आमदार गायकवाड यांच्या पाठिशी लोक आहेत, ते लोकनेता आहेत.
शेवटी एका कवीच्या ओळी आठवल्या..
कोरोडोच्या या देशात
लाखो कीर्तने होतात
तितकेच तमाशेही होतात
पण किर्तनाने कोणी सुधरत नाही
आणि तमाशाने कोणी बिघडत नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here