Home Breaking News खामगाव पोलिसांचे पुन्हा कोंबींग ऑपरेशन:  १ देशी पिस्तूल, शस्त्रासाठ्यासह नकली नाणी जप्त

खामगाव पोलिसांचे पुन्हा कोंबींग ऑपरेशन:  १ देशी पिस्तूल, शस्त्रासाठ्यासह नकली नाणी जप्त

 

खामगाव: सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीला मागील गुरुवारी खामगाव पोलिसांनी अटक केली होती, त्यांची चौकशी केली असता आणखी धागेदोरे हाती लागले, त्याआधारे आज पहाटे पुन्हा तालुक्यातील जंगल परीसरात पोलिसांनी ऑपरेशन राबविले. यात दोन अट्टल गुन्हेगार पकडण्यात आले असून त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्या, मोबाईल, तलवारी व मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. २० अधिकारी, दोन आरसीबी पथक, ५० अंमलदार असा मोठा ताफा घेवून ही

कारवाई करण्यात आली.

-खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय होती, या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. कमी किंमतीत नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा. सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे ग्राहकाकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा अशी प्रॅक्टीस असलेल्या टोळीने ५ मे रोजी पुणे येथील दोन व्यवसायिकाची अशीच फसवणूक केली गेली. याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी अंत्रज येथे कोंबींग आॅपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील १५ जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला

. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा या भागातील जंगलात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात आणखी दोन जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. आरोपी कडून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक देशी पिस्तुल व मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा, मोबाईल, नकली सोने चांदी असा  3 लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here