Home Breaking News Sp अरविंद चावरिया यांनी दिला ‘हा’इशारा

Sp अरविंद चावरिया यांनी दिला ‘हा’इशारा

कोविडमुळे पालकत्व गमविलेल्या असहाय्य  मुलांबाबत १०० व १०९८ हेल्पलाईन वर द्यावी

बुलडाणा, दि. ११: जगभरात कोविड चे थैमान वाढत असतांना त्यासोबत अनेक नवीन समस्या जन्म घेत आहेत. तरुण मुला-मुलींचे मृतदेह खांद्यावरुन नेत असतांना वृद्ध वडीलांचे खांदे वाकत आहेत, तर अकाली आईवडीलांचे छत्र हरविल्याने बालके पोरकी झाली आहे. अचानकपणे आई-वडीलांचे छत्र हरविल्याने लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे परंतु या परिस्थीतीचाही फायदा घेणारे समाजकंटक दुरदैवाने आपल्या समाजात असल्याचे चित्र दिसुन येते. कोविडमुळे पालकत्व हरविलेल्या अनाथ, असहाय्य मुलांवर अत्याचार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया यांनी दिला आहे.
“तिन दिवसांची मुलगी आणि सहा महिन्यांच्या मुलीने कोविड मुळे पालकत्व हरविले असुन अशा मुलांना नवीन जीवन मिळविण्यास मदत करा. या मोबाईल नंबरवर कॉल करा” अशा प्रकारचे मॅसेजेस वॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर या सोशल मिडीयावर फिरत आहेत. वर्षानुवर्षे मुल होण्याची वाट पाहणारे संवेदनशील जोडपे अशा मॅसेजला बळी पडू शकतात. तसेच लहान मुलांची तस्करी करणा-या टोळयांना कोविडमुळे आयती संधी मिळत आहे. मुल दत्तक घेण्याचे ही प्रक्रीया बेकायदेशीर असुन असा प्रकार आढळून आल्यास त्यावर कडक कार्यवाहीचे आदेशही जिल्हयाचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी दिले आहे.
अशा प्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती ही भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच दत्तक नियमावली 2017 नुसार कठोर कार्यवाही करण्यास पात्र असुन बुलडाणा पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ ( सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करु शकतात. तसेच राज्यात कोठेही कोविड-19 चे कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास याबाबतची तात्काळ माहिती बुलडाणा पोलीस घटकास हेल्पलाईन १०० तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर देण्यात यावी. तसेच संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (state adaption resource agency) च्या
8329041531 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here