Home Breaking News राजुर घाटात खोल दरीत ट्रक कोसळला एकाचा मृत्यू तर एक गंभीर

राजुर घाटात खोल दरीत ट्रक कोसळला एकाचा मृत्यू तर एक गंभीर

 

मलकापूर- बुलढाणा -मलकापूर या राष्ट्रीय महामार्गावरील राजुर घाटात 500 फूट दरीत ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी घडली.या अपघातात ट्रक चालक पिर मोहम्मद याचा जागीच मृत्यू झाला असून शेद्रुन मौज खान हा जखमी झाला आहे. ट्रक इतका खाली कोसळला की दिसत नव्हता.नव्हता मात्रअग्निशामन दलाच्या मदतीने पोलिसांनी ट्रक पर्यंत पोहचून चालक-वाहकाला रेस्क्यू केले.

बुलडाणा वरून मलकापूर कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील राजूर घाटात आर.जे.02 जी.बी.0924 या क्रमांकाचा ट्रक नारळ घेवून मलकापूरच्या दिशेने जात होता.दरम्यान घाटातील हनुमान मंदिराजवळील वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळला.ट्रक इतका खाली गेला होता की,ते दिसत नव्हता. या अपघातात ट्रक चालक पिर मोहम्मद मृत्यु तर शेद्रुन मौज खान हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिली,पोलीस तात्काळ घटना स्थळी दाखल झाले होते.

जबाबदार बना

ट्रक  खोल दरीत कोसळल्यामुळे अग्निशमण दलाला पाचारण करण्यात आले होते,अग्निशामक वाहनातील दोरीच्या साहाय्याने पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी दरीत उतरून मृतदेहकाचा मृतदेह व जखमीला वर काढण्यात आले,व जखमीला पुढील उपचारसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here