Home आरोग्य रोज एक मृत्यू, डॉक्टर दिसले की लोक करतात दरवाजे बंद!

रोज एक मृत्यू, डॉक्टर दिसले की लोक करतात दरवाजे बंद!

बुलडाणा जिल्ह्यातील वसाळी हे 95 टक्के आदिवासी बहुल भाग असलेलं सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल गाव. कोरकू ,निहाल ,भिल, भीलाला हे या गावातील मुख्य आदिवासी जमाती. बुलढाण्यातील प्रत्येक वर्ग1 अधिकारी वसाडीला आले नसावे असं कधी घडलं नाही.
निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे आदिवासी गाव. या गावाची हवा कुणालाही हवीहवीशी वाटणारी. आदिवासींचे वेगवेगळ्या जमाती नुसार वेगवेगळी वेशभूषा, वेगवेगळी भाषा आणि त्यामध्ये नटलेलं सातपुड्याच्या सौंदर्य ,अधिक उल्लेखनीय असलेलं अंबाबरवा अभयारण्य या सर्व वातावरणामध्ये वसाडी गावावर मात्र मागील पंधरा दिवसांपासून काळाने घाला घालण्याचं काम होत आहे…….!

मागील पंधरा ते वीस दिवसात दररोज मृत्यू होत असल्याचं वसाडी वासी सांगताहेत. यापैकी बरेचसे covid-19 आजारामुळे मृत्यू पावल्याची अधिकृत जरी नसली तरी सत्य माहिती आहे याचे मुख्य कारण म्हणजे येथील नागरिक घाबरलेल्या परिस्थिती मनस्थितीत आहे. आरोग्य विभाग किंवा दवाखान्यात गेल्यानंतर भरती करून घेतात आणि नंतर आपला मृत्यू होतो अशा पद्धतीची त्यांची धारणा झालेली त्यामुळे सदर् नागरिक ही बिमारी अंगावरच वाढू देतात …….त्यावेळेस बिमारी हाताबाहेर जाते त्यावेळेस दवाखान्यात कॉन्टॅक्ट करतात तोपर्यंत वेळ झालेली असते बरेच पेशंट दोन-चार दिवस उपचार घेऊन मृत्युमुखी पडलेले आहे पण तरी जागृत नागरिक यांनी वेळेवर ट्रीटमेंट घेऊन घरी सुखरूप पोहोचलेले सुद्धा आहे परंतु बऱ्याच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याठिकाणी मृत्यू का होत आहे आणि कोरोना positive ची संख्या वाढत का आहे ? याची माहिती घेतली असता त्या ठिकाणी जागरुकतेचा अभाव प्रकर्षाने जाणवला म्हणून आज लोकांना समुपदेशनाची गरज असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर स्वातीताई वाकेकर, डॉक्टर संदीप वाकेकर , डॉक्टर राहूल ढगे, डॉक्टर संतोष जयस्वाल यांच्यासह काँग्रेस ची टीम आम्ही वसाडी हे गाव गाठले तसेच नेहमीच संपर्क असलेल्या गावांमध्ये आमच्या सोबत असलेल्या डॉक्टरच्या टीमला पाहताच नागरिकांनी दरवाजे बंद करून आत मध्ये स्वतःला बंद केले एवढी……… एवढी भीती ?….

लसीकरणामुळे असल्याची माहिती उघड झाली… त्यामुळे सदर गावातील नागरिकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे आम्ही एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला परंतु पुढील दिवसांमध्ये जोपर्यंत या गावचे संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत काम करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये ज्यांना सामील व्हायचे असेल त्यांचे स्वागतच आहे.


यावेळी संग्रामपुर तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, हुसेन पालकर, सरपंच मैणाबाई पालकर , अशोक पालकर, सचिन पालकर , कपिल पालकर , सिकंदर सिंग बाबर मारुती कास्‍देकर, रमेश भाऊ लोणकर , धर्मेंद्र इंगळे व नितीन जाधव तसेच इतर गावकरी उपस्थित होते .

{काँगेस नेते स्वप्निल देशमुख सोनाळा, यांची फेसबुक पोस्ट)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here