Home Breaking News रस्ता अपघातात दोन जण ठार

रस्ता अपघातात दोन जण ठार

बोरीअडगाव:-रस्ता अपघातात दोन जण ठार झाले असल्याची घटना आज घडली आहे.

रस्ता अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. कालच लाखनवाडा येथे अपघातात दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा अपघात घडला. या भीषण अपघातात 2 जण मृत्युमुखी पडले आहेत.
बोरी अडगाव येथून जात असताना फोर व्हीलर MH28AZ9475 आर्टिका गाडी निंबाच्या झाडाला आदळून दोघांचा मृत्यू तर तीन जखमी ही घटना जवळ असलेल्या आंबेटाकळी शिवारात घडली. मृत्यू झालेले नितीन जनार्दन सुरवाडे(24) राहुल बाबुराव सुरवाडे( 24) हे आहेत. संदीप तानाजी सुरवाडे, रोशन राजकुमार सुरवाडे, मंगेश नारायण सुरवाडे अशी जखमींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here