Home लेख जहा लोक सोचना बंद कर देते है, वहा राणा की सोच शूरु...

जहा लोक सोचना बंद कर देते है, वहा राणा की सोच शूरु होती है..’

 

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची खामगाव मतदारसंघात असलेली पकड १ मे रोजी त्यांच्या वाढदिवसाला अधोरेखित झाली. १५ वर्षे आमदार म्हणून काम केल्यावर त्यांनी जो गोतावळा जोडला, तो आजही त्यांच्या सोबत भक्कम तटबंदी सारखा उभा आहे, हेही दिसले. दिलीपकुमार सानंदा हे बुलडाणा जिल्ह्यातील एक अनोखे व दखलपात्र व्यक्तीमत्व. सत्ता काही वर्षे नसली तरी आपला राजकीय दबदबा टिकवून ठेवण्यात ते आजवर यशस्वी राहीले आहेत, असे म्हटलं ते योग्यच राहील. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खामगावला आले की सानंदा यांची तोंडभरून स्तुती करतात. ‘दबंग नेता’ अशी बिरुदं लावून त्यांना कामाची पावतीच दिली जाते.सत्ता नसली की ग्रीष्मात पानगळ लागावी तशी गळती राजकीय पक्षाना लागते, तसेच खामगाव मतदार संघातील सानंदा यांचे काही जवळचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले असले तरी नव्या दमाची टीम उभी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे.
कोरोनाची परिस्थिती असल्याने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस नेहमी सारखा धडकेबाज साजरा झाला नसला तरी सामाजिक बांधिलकीची किनार या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिसून आली. गावागावात रक्तदान शिबिरं झाली, शेकडो तरूण रक्तदान करण्यासाठी समोर आले. यावेळी हार तुरे नव्हते पण विधायक उपक्रम राबवून सानंदा यांनी सामाजिक जाणीव दाखवून दिली.
‘जबतक जिंदा हूं; काँग्रेस का परिंदा हूं’ असे सानंदा नेहमीच म्हणतात. ते त्यांच्या कृतीतून पुन्हा दिसून आले. वाढदिवसाला संघटनावरील आपली पकड सुध्दा त्यांनी सिद्ध केली आहे. अनुभव माणसाला परिपक्व करणारा गुरु असतो. याच अनुभवातून कदाचित लोक म्हणतात तसे आता सानंदा बदलेले आहेत, हा लोकाभिमुख बदल त्यांच्या आगामी राजकीय कारकिर्दीकरिता चांगला संकेत आहेत. एका प्रगल्भ राजकीय व्यक्तीकडे हवा असतो तितका राजकीय मुत्सद्दीपणा त्यांच्यात ठासून भरलेला आहे, राजकीय डावपेचतही त्यांचा हातखंडा आहेच. गळयात असलेल्या कॉंग्रेसच्या तिरंगी दुपट्टासोबत इमान राखत ‘चोवीस बाय सात’ राजकारण , समाजकारण माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा करत आहेत.
‘जहा लोक सोचना बंद कर देते है, वहा राणा की सोच शूरु होती है..’ असं सानंदा यांच्या बाबतीत त्यांचे चाहते म्हणतात. शेवटी असे म्हणतात…’थककर रुक जाणा जिन्हे मंजूर नही, उनके लिये कोई भी मंजिल दूर नही ‘आगामी काळात त्यांच्या हातून लोककल्याणकारी कार्य घडावे हीच वाढदिवसा निमित्ताने मनस्वी शुभेच्छा!

अजिंक्य भारत पेपरला दखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here