Home कोरोना अपडेट्स अठ्ठेचाळीसतासात वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचाही कोरोनाने मृत्यू 

अठ्ठेचाळीसतासात वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचाही कोरोनाने मृत्यू 

 

नांदुरा – कोरोनाची दुसरी लाट शहरासोबत ग्रामीण भागातही कहर करत असून वाढती रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . निमगाव येथील विश्वनाथ काशीराम गावंडे यांचा मृत्यू दि.१ मे रोजी झाला अठ्ठेचाळीस तासांचा ही कालावधी उलटला नाही तर त्यांच्या तरुण विधिज्ञ मुलाचे दि.२ मे ज्या संध्याकाळी मृत्यू कोरोणाने झाला. एकाच घरातील दोघे अठ्ठेचाळीस तासांत कोरोणाचे बळी ठरल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .

निमगाव येथील रामदल चौक परिसरात राहणारे विश्वनाथ काशीराम गावंडे वय ७५ वर्ष व त्यांचा मुलगा तरुण विधिज्ञ कैलास विश्वनाथ गावंडे वय ३६ या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने वडील खामगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरवर तर मुलगा कैलास हा शेगाव येथील खाजगी कोविड सेंटरवर उपचार घेत होता. दि.१ मे चा संध्याकाळी वडील विश्वनाथ काशीराम गावंडे यांची प्रकृती खालावली व त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला . त्यांचा अंत्यसंस्कार करून घरी परतलेल्या गावंडे कुटूंबियांना मुलगा तरुण विधिज्ञ कैलास याची प्रकृती खालावल्याचे समजले व त्याचा सुद्धा कोरोनाने दि. ३ मे चा सकाळी अठ्ठेचाळीस तासांच्या आत मृत्यू झाला .

दि.३ मे च्या सकाळी निमगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . चोवीस तासांत वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने येथील नागरिक भयभीत व चिंताग्रस्त झाले असून सर्व गावावर शोककळा पसरली आहे. मृतक विधिज्ञ कैलास गावंडे हे नांदुरा येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत होते .

स्वरा झाली पोरकी

विधिज्ञ कैलास गावंडे यांच्या पश्चात पत्नी व चिमुकली मुलगी स्वरा असून आबा पाठोपाठ तिचे वडील कैलास गावंडे यांचाही कोरोनाने बळी घेतल्याने इवलीशी स्वरा मात्र पोरकी झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here