Home खामगाव तालुका काळ आला होता, वेळ नाही…बरे झाले भाऊ बहिणीचे दैव आड आले !

काळ आला होता, वेळ नाही…बरे झाले भाऊ बहिणीचे दैव आड आले !

 

खामगाव- देव तारी त्याला कोण मारी असे आपण म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्या अवती भवती अश्या घटना घडत असतात. बरेच लोक नशीब आणि दैव यावर विश्वास ठेवत नसतात मात्र माणसाच्या हातून घडलेली चांगली कामे नक्कीच आड येतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अशीच एक घटना आज खामगाव तालुक्यातील लाखबवाडा भागात घडली आहे. पुढे या बातमीत आपण त्याबाबत नेमके काय घडले हे जाऊन घेणार आहोत. आपण therepublic हे महाराष्ट्रातील आघाडीचे वेब पोर्टल वाचत आहात. आम्ही आपणास जाणीव करून देत आहोत की आपण सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता नियम पाळणे बंधनकारक आहे. सोबतच रस्त्यावर वाहने चालवीत असताना सुद्धा आपण काळजी घ्यावी.


आज सकाळी बोलोरो पिकअपची मोटरसायकलला धडक लागून दोन जण जखमी झाले आहेत. घटना अशी आहे की, भरधाव वेगाने येणाऱ्या बोलोरो पिकअपने दुचाकीस दिल्याची घटना आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान लाखनवाडा फत्तेपुर रोड घडली. उन्द्रीवरून लाखनवाडा कडे येणाऱ्या मोटरसायकल व बोलोरो पिकअप यांच्यात टक्कर झाल्यामुळे दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींना ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यात एक महिला आणि पुरुष जखमी असून त्यांची तब्येत स्थिर आहे.मनोज पिंपळे वय 26 वर्षे आणि रेणुका देशमुख 30 अशी त्यांची नावे आहेत. दोघेही राजूर रा. भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी आहेत. ते बहीण भाऊ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here