Home कोरोना अपडेट्स जंगलाचा राजा कोरोनाने बळी,व्हायरस आता जनावरांमध्येही!

जंगलाचा राजा कोरोनाने बळी,व्हायरस आता जनावरांमध्येही!

कोरोनाची दुसरी लाट माणसासाठी तर घातक ठरतच आहे दुसरीकडे प्राणी सुद्धा या आजाराचे बळी ठरत आहेत. जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह सुद्धा या आजाराने मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोरोनामुळे सिंहाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला देत सर्व राज्यांना यासंदर्भात एक एडव्हायजरी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, सरंक्षित वन क्षेत्र तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे भाग पर्यटकांपासून लांब ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय वन मंत्रालयाचे डीआयजी राकेकश जगेनिया यांनी ही एडव्हायजरी जाहीर केली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतोच आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक 4 लाख रुग्ण फक्त एका दिवसांत आढळले आहेत. एका दिवसातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 32 लाखांच्या पार गेली आहे. मात्र, आता याहून दु:खद अशी एक बातमी समोर आली आहे. कोरोनाचा व्हायरस आता जनावरांमध्ये देखील पसरत आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या संक्रमणामुळे एका सिंहांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संक्रमण आता प्राण्यांमध्ये पसरलेलं असून ते मोठ्या प्रमाणावर पसरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने खबरदारीचे अनेक उपाय राबवण्यात येत आहेत.

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोरोनामुळे सिंहाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्यांना यासंदर्भात एक एडव्हायजरी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, सरंक्षित वन क्षेत्र तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे भाग पर्यटकांपासून लांब ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अशी आहे आकडेवारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकड्यानुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे नवे 4,01,993 प्रकरणे सापडली आहेत. यासहित एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,91,64,969 वर पोहोचली आहे. तर काल 3,523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 2,11,853 वर पोहोचली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here