Home रीडर कनेक्ट वर्षभरात अशी वाढली गॅसची किंमत!

वर्षभरात अशी वाढली गॅसची किंमत!

 

रिपब्लिक डेस्क

गेल्या वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यात खाद्यतेल, किरणा, डाळी यासोबतच घरगुती गॅसच्या किंमतीत सुद्धा मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळते.

कोरोनाची लाट आल्यावर गेल्या वर्षे वर्षभरात सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. त्यात महागाई सुद्धा भर घालत असून आधीच व्यवसाय, रोजगार बंद आहेत तर महागाई कंबरडे मोडत आहेत. हळूहळू वाढ होत असल्याने ही बाब लक्षात येत नाही. जसे 90 रुपयाला मिळणारे 1 लिटर सोया तेल आता 150 ते 160 रुपये झाले तशीच घरगुती गॅसची किंमत सुद्धा हळूहळू वाढत गेली आहे.

दरवाढ दाखविणारा तक्ता

 

अशी वाढली किंमत !

जानेवारीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी ६९४ रुपयांच्या गॅस सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढून ती ७१९ रुपये झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी पुन्हा किंमत वाढली. पुन्हा १ मार्च रोजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आणि सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात गॅसच्या किंमतीत केवळ १० रुपयांनी कपात झाली त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये झाली. तर काही जिल्ह्यातील किंमत ८२४ रुपये आहे.

एप्रिलमध्ये १० रूपये कपात

आपल्या देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यानुसार, विनाअनुदानित १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत ४५.५० रुपयांनी कपात झाली आहे. मात्र, घरगुती गॅस ग्राहकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांनी कपात झाली होती. यानंतर महाराष्ट्रात सध्या १४ किलो गॅसच्या सिलिंडरची किंमत ८१४ रुपये आहे.

(LPG Price in Buldhana (May 2021) LPG price in Buldhana, are largely dependent on international prices of crude. When these go higher, LPG cylinder rates in Buldhana also tend to move higher. For the poorer sections, the government has subsidized these prices. Cooking gas is now easily accessible to most of the population in Buldhana. Price of Non-Subsidised LPG cylinders today in Buldhana is at ₹ 824.00. These are revised every month by the government of India.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here