Home Breaking News ‘त्या’ प्रकरणात भाजपा नगरसेवकावर आणखी एक गुन्हा ; दुसऱ्या घटनेत एकाने पोलीस...

‘त्या’ प्रकरणात भाजपा नगरसेवकावर आणखी एक गुन्हा ; दुसऱ्या घटनेत एकाने पोलीस ठाण्यातच अंगावर घेतले पेट्रोल

 

खामगाव – येथील फरशी भागात लॉकडाऊनचे उल्लंघन करत अवैधरित्या दारू विकणाऱ्या डिलेव्हरी बॉयसह दोघांविरूध्द व भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान रविवारी रात्री शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये भाजपा नगरसेवक राकेश राणा (राठोड) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या घटनेत आकाश शेळके या युवकाने पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात घडली आहे.

लॉकडाऊन काळात येथील फरशी भागात एक इसम अवैधरित्या दारू विकत असल्याची माहिती नागरिकांनी नगरसेवक राकेश राठोड यांना दिली होती. त्यांनी लगेचच तेथे पोहचून सदर इसमास थांबवून त्याची चौकशी केली असता तो इसम थैलीमध्ये अवैधरित्या देशी दारू घेवून जाताना दिसून आला. राठोड यांनी गायकवाड याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी प्रशासनावावर जोरदार टीका करत ‘ सचिन वाझे सारखे टार्गेट बुलडाणा प्रशासनाला आहे काय’ अश्या तिखट शब्दांत प्रतिक्रिया देत दोषींवर कारवाई केली नाही तर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते याकडेही सर्वाचे लक्ष होते. दरम्यान रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भाजपचे नगरसेवक राकेश राणा हे सजनपुरी येथील सानंदा यांच्या दारू गोडाऊनवर आले. त्यांनी दारूची मागणी केली फिर्यादीने दारू देण्यास नकार दिला असता तु मला ओळखत नाही का मी नगरसेवक आहे असे म्हणत शिवीगाळ केली तसेच वाहनांना व गोडावुनला आग लावून देईल अशी धमकी दिल्याची तक्रार राणा ट्रेडर्सवरील वाचमन डीगंबर वानखडे यांनी दिली.यावरून शिवाजी नगर पोलिसांनी राकेश राणा यांच्या विरोधात कलम 294, 506 नुसार गुन्हा दाखल केला.

ठाण्यातच पेट्रोल घेतलं अंगावर

 

रविवारी सायंकाळी सनी पँलेस भागातील आकाश शेळके याने शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरडाओरडा करत माझेवर रेड का करता, सर्व अवैध धंदे बंद करा असे अंगावर पेटोल घेतले. या प्रकरणी आकाश शेळके विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सट्टा प्रकरणात कारवाई झाली म्हणून त्याने हे पाऊल उचलले आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान शहरात अवैध धंदे सुरू नाहीत, आढळून आले तर कारवाई होईल. कुणाचाही गय केली जाणार नाही अशी माहिती ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here