Home कोरोना अपडेट्स ‘तुम्ही काळजी घ्या’ असा मेसेज टाकून त्यांनी घेतला जगाचा निरोप…

‘तुम्ही काळजी घ्या’ असा मेसेज टाकून त्यांनी घेतला जगाचा निरोप…

राज्यात 105 पत्रकार कोरोनामुळं बळी

बुलडाणा : “मला कोव्हिड झाला असून माझ्यावर उपचार सुरू आहेत. मित्राबरोबर मोटारीत गेलो होतो, त्यावेळी मला कोरोनाची बाधा झाली. दुचाकी असो किंवा चारचाकी, एकट्यानेच प्रवास करा. कुणालाही सोबत नेऊ नका. बाहेर जेवण करू नका, चहा किंवा नाष्टाही करू नका. डबल मास्क वापरा. घरी येईपर्यंत मास्क काढू नका. मी वाईट अनुभव घेत आहे. फोन बंदी आहे. मुलगा बाहेर गेलाय म्हणून मॅसेज करतोय. ऑक्सिजन लावलेला आहे. आणखी काही दिवस रुग्णालयातच मुक्काम असेल.

काळजी घ्या. श्राद्ध, अंत्यविधी, लग्न, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांना जाऊ नका. कसलीच भीड बाळगू नका. लाखो रुपयांचा खर्च होतो. मी आणि पत्नी दोघेही एकाच खोलीत उपचार घेत आहोत. सहा दिवस झाले. पण आता प्रकृती स्थिर आहे.” ही शेवटची पोस्ट लिहून अहमदनगरचे लोकसत्ता प्रतिनिधी अशोक तुपे यांनी जगाचा निरोप घेतला. या मेसेजनंतर काही दिवसांनी अशोक तुपे यांची प्राणज्योत मालवली.

हीच अखेरची पोस्ट

तुपे यांचा हा मेसेज स्टेटसला ठेवून अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. कोरोनाचा धोका आणि भयानक परिस्थिती यांची जाणीव लोक एकमेकांना करून देत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र असतानाच पत्रकारितेतील तीन वरिष्ठांचं गुरुवारी (22 एप्रिल) निधन झालं आहे. अहमदनगरचे लोकसत्ता प्रतिनिधी अशोक तुपे, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा आणि सोपान बोंगाणे यांचा समावेश आहे. तर दिल्लीतही काही पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूज लाँड्रीचे पत्रकार आशिष येचुरी यांचं कोरोनाने निधन झाल्यावर पत्रकारिता वर्तुळात शोककळा पसरली आहे.महाराष्ट्रात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेने दिली आहे.
—————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here